नऊ दिवसांपासुन अखंड जागर; आज सुरज शर्मा व संच यांचा जागरणाचा कार्यक्रम, सोमवारी भव्य महाप्रसादाचे आयोजन
राजेश वरटकर
मुख्य संपादक
शिवशाही न्युज
गाढवभुकी माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भक्तिमय वातावरण निर्माण झाले असुन, देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासुनच भाविकांची मोठी गर्दी होत आहे. नऊ दिवसांपासुन मंदिरात जागर सुरू असुन, भक्तांच्या जयघोषाने संपुर्ण परिसर दुमदुमुन जात आहे.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची वाढती गर्दी पाहायला मिळत असुन, परिसरात उत्साह आणि भक्तीचा संगम अनुभवायला मिळत आहे.
आज सुरज शर्मा व संच यांचा जागरणाचा कार्यक्रम!
भाविकांसाठी आज सुरज शर्मा व संच यांच्या जागरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातुन देवीचा जागर होणार असुन, भाविकांना भक्तिसंगीताचा आनंद घेता येणार आहे.
सोमवारी १९ तारखेला भव्य महाप्रसाद
नवरात्रोत्सवानिमित्त सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
गाढवभुकी माता मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असुन, रोज आरती साठी वर्धा, नागपुर येथुन भाविक हजेरी लावतात. नवरात्रोत्सव श्रद्धा आणि उत्साहात साजरा होत आहे.



