विशेष प्रतिनिधी
नागपुर
नागपुर, : महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचा ‘रजत महोत्सव’ व ‘सुवर्णालंकार’ मासिकाच्या 30 वर्षपुर्तीनिमित्त आयोजित सर्वशाखीय, राज्यस्तरीय ‘सोनार महोत्सव २०२६’ मध्ये पुलगाव येथील सुप्रसिद्ध डॉ. सचिन ढोमणे यांना प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र सुवर्ण रत्न पुरस्कार‘ प्रदान करून गौरविण्यात आले.
कविवर्य सुरेश भट सभागृह, नागपुर येथे रविवार दि. ३ मे रोजी झालेल्या भव्य राज्यस्तरीय महिला मेळाव्यात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
संस्थेचे संस्थापक/संपादक पुरुषोत्तम कावळे, मुख्य संपादक प्रकाश माधने आणि अध्यक्ष यांच्या हस्ते डॉ. सचिन ढोमणे यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
“आपल्या कर्तृत्वाचा सुगंध आणि सेवेचा प्रकाश आपल्या कार्यातुन सदैव दरवळत राहिला आहे. आपल्या अलौकिक यशाचा सन्मान म्हणुन ‘महाराष्ट्र सुवर्ण रत्न पुरस्कार’ आपणाला प्रदान करीत आहोत याचा आम्हास सार्थ अभिमान आहे,” अशा शब्दांत सन्मानपत्राद्वारे डॉ. ढोमणे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेच्या 25 वर्षांच्या व ‘सुवर्णालंकार’च्या तीन दशकपुर्तीच्या सोहळ्यानिमित्त संपुर्ण राज्यभरातुन सुवर्णकार बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
डॉ. सचिन ढोमणे हे पुलगाव तालुक्यातील एक नावाजलेले व्यक्तिमत्व असुन, त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या या सन्मानाबद्दल पुलगाव व संपुर्ण जिल्ह्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

