भद्रावती हादरली! अपहरण करून सुपारीतुन खुन; चौघे जेरबंद
चंद्रपूर | भद्रावती प्रतिनिधी
भद्रावती तालुक्यातील एका थरारक आणि नियोजनबद्ध हत्याकांडाचा पोलिसांनी पर्दाफाश केला असुन, अपहरण करून सुपारीच्या माध्यमातून खून घडवुन आणल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून, संपुर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 550/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1), 140(1) आणि 61(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर आणि भद्रावती पोलिसांच्या संयुक्त कारवाईतुन या गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यात आला.
सुपारीतुन रचला मृत्युचा कट
प्राथमिक तपासात समोर
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दीपमाला कुलमेथ हिने वैयक्तिक कारणातुन मृतकाचा काटा काढण्याचा निर्णय घेत आरोपी वर्षा परचाके हिला सुपारी दिली. त्यानंतर या कटात प्रवीण उर्फ सोनु आणि नाजीर अन्सारी यांना सामील करून संपुर्ण योजना आखण्यात आली.
आरोपींनी अत्यंत थंड डोक्याने मृतकाचे अपहरण केले आणि त्यानंतर त्याची हत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी
दीपमाला रविंद्र कुलमेथ (42) – रा. वरोरा
वर्षा राजु परचाके (47) – रा. मानेवाडा, नागपुर
प्रवीण उर्फ सोनु (31) – रा. दाहोदा, ता. रामटेक, जि. नागपुर
नाजीर नसरुल अन्सारी (28) – रा. चौदामैल, नागपुर
संयुक्त कारवाईत पोलिसांचे यश
स्थानिक गुन्हे शाखा आणि भद्रावती पोलिसांनी तांत्रिक तपास, माहितीदारांचे जाळे आणि सततच्या पाठपुराव्याच्या जोरावर आरोपींपर्यंत धागेदोरे जोडले. अखेर सापळा रचत चौघांनाही अटक करण्यात आली.
सध्या सर्व आरोपी भद्रावती पोलिसांच्या कोठडीत असुन त्यांच्याकडुन सखोल चौकशी सुरू आहे.

