वर्धा : शहरातील महिला आश्रम परिसर रविवारी रक्तरंजित झाला. आपसी वादातून झालेल्या हिंसक घटनेत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, संपुर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका युवकाच्या वडिलांवर वादाच्या पार्श्वभूमीवर चाकुने हल्ला करण्यात आला.यात आरोपीने बाप लेकावर चाकुने हल्ला केला यावेळी तेथे उपस्थित नागरिकांनी गंभीर जखमी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला.शनिवारी रात्री महीला आश्रम परिसरात दोघांचा आपसी वाद चालु असताना अचानक आरोपीने जवळील चाकुने हल्ला केला.आपसी वादाचे पर्यवसान हाणामारी वर गेला यावेळी नागरिक हा वाद बघण्यासाठी घटनास्थळी हजर असताना हा वाद इतका तिव्र झाला की त्यात दोघांचा जीव गेला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
या दुहेरी खुनामुळे बरबडी येथील संबंधित कुटुंबावर शोककळा पसरली आहे. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असुन गावात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकरणात एका विधिसंघर्षित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असुन, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेमागील नेमके कारण वादाचे स्वरूप काय होते, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
घटनेनंतर महिला आश्रम परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, अशा घटना टाळण्यासाठी कडक कारवाईची मागणी होत आहे.

