संबंधित कामात अनियमितता झाल्याचा आरोप; विभागीय वनाधिकाऱ्यांकडे तक्रार
सेलू | प्रतिनिधी
वनविभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या रोपवाटिका/रोपवनाच्या कामाबाबत गंभीर आक्षेप नोंदवत संबंधित प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात मा. विभागीय वनाधिकारी, वर्धा यांच्याकडे लेखी निवेदन साद करण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, संबंधित कामासाठी सन २०२६ मध्ये मंजुरी देण्यात आली असून त्याअंतर्गत रोपे तयार करणे, त्यांचे संगोपन करणे तसेच इतर आवश्यक कामे करण्यात येत आहेत. मात्र या कामाच्या अंमलबजावणीबाबत काही बाबींवर संशय व्यक्त करण्यात आला असून प्रत्यक्ष कामाची पाहणी करून वस्तुस्थिती तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणात संबंधित व्यक्ती व कामाशी निगडित नोंदींची तपासणी करावी, प्रत्यक्ष स्थळपाहणी करावी तसेच शासनाच्या निधीचा योग्य वापर झाला आहे किंवा नाही, याची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, निवेदनासोबत संबंधित कामाशी निगडित काही व्यक्तींची नावेही देण्यात आली असून त्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून या तक्रारीची दखल घेऊन नेमकी काय कारवाई केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.
चौकशीअंती सत्य समोर येणार
संबंधित कामातील सर्व कागदपत्रे, मंजुरी, खर्च, प्रत्यक्ष कामाची स्थिती आणि लाभार्थी यांची तपासणी झाल्यास या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विभागीय वनाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
