शिवशाही न्युज नेटवर्क
सेलु
ईद-उल-फित्रनिमित्त सेलु शहरासह घोराड येथे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. घोराड येथे मुस्लिम बांधवांकडुन सकाळी भव्य मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीचे श्री संत केजाजी महाराज मंदिराजवळ आगमन झाल्यानंतर बशीरभाई शेख व परिवाराच्या वतीने दुध ,चहा व केळीचे वितरण करून स्वागत करण्यात आले.
यानंतर मिरवणुक सेलु विकास चौकात पोहोचली. येथे कलीम शेख यांच्या वतीने पोहे, मोट व शरबतचे वाटप करण्यात आले. तसेच नवचैतन्य बौद्ध कमिटी, सेलुच्या वतीने जलेबीचे वितरण करण्यात आले. विविध समाजबांधवांनी मिरवणुकीचे उत्स्फुर्त स्वागत करत सामाजिक सलोख्याचा संदेश दिला.
त्यानंतर बाजार रोड येथील जामा मश्जिद येथुन भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी नागरिक व विविध समाजबांधवांकडून मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. यावेळी शरबत, नाश्ता, केळी, हलवा आदींचे वितरण करण्यात आले.
ईदच्या निमित्ताने शहरभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.मेडीकल चौक येथे साहसिक जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष रवींद्र कोटंबकार, शिवशाही न्युज नेटवर्क चे मुख्य संपादक राजेश वरटकर,पिंटु पांडे,पवन रहांगडाले यांनी समाज बांधवांना ईद च्या शुभेच्छा दिल्या.
धार्मिक उत्सवासोबतच विविध समाजांच्या सहभागातुन सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचे दर्शन घडले.
सेलु पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक उगले यांच्या नेतृत्वाखाली राकेश देवगडे,जावेद धामिया, सुनिल चावरे यांचे सह गृहरक्षकांनी चोख बंदोबस्त ठेवुन शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मदत केली.
दरम्यान, रात्री माहेर मंगल कार्यालय येथे ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.




