
राजेश वरटकर
मुख्य संपादक
प्राथमिक आरोग्य केंद्र सालई कला अंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्र घोराड येथे मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले यांनी
मंगळवार दि.२१ ला लसीकरण सत्रास भेट दिली. यावेळी श्री शिंदे जिल्हा आरोग्य विस्तार अधिकारी तसेच डॉ.राम वरठी, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. या वेळी लसीकरण सत्राची पाहणी करण्यात आली. औषधी साठा तपासुन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधुन “आपले गाव, आरोग्य संपन्न गाव” या अभियानासाठी मार्गदर्शन केले. यावेळी उपकेंद्र प्रमुख डॉ.पिसे, आशा वर्कर निशा ईखार, संजिवनी माहुरे ,रेखा लोंढे,वांढरे , डंभारे व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

