ता.प्र.सेलु
सेलु येथील दीपचंद चौधरी विद्यालयाने मार्च २०२६ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेत आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. शाळेचा एकुण निकाल ९५.४४ टक्के लागला असुन, कु. दिशा राजु पोहाणे हिने ९५.६० टक्के गुण मिळवुन शाळेतुन प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.यावर्षी शाळेतुन एकूण ३२९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ३१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे तब्बल ६५ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी (Distinction) मिळवली आहे, तर ११२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.शाळेतील पहिले पाच गुणवंत विद्यार्थी:१. कु. दिशा राजु पोहाणे – ९५.६०% (प्रथम)२. जान्हवी दिवाकर माहुरे – ९३.००% (द्वितीय)३. कु. दर्शना अनिल चलाख – ९१.६०% (तृतीय)४. कु. नंदिनी मारोतराव लाडे – ९०.४०%५. कु. कृतिका राजु नाईक – ८९.८०%या घवघवीत यशाबद्दल मुख्याध्यापिका डॉ. कल्पना मकरंदे, पर्यवेक्षक हरिहर मुडे व गोपाल खंडागळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशात वर्गशिक्षक मिथुन हांडे, नितीन वांदिले, प्रवीण घोडखंडे, सुनील झाडे, ज्योती लोडे, मंगेश वडुरकर, सुनील घोडमारे, प्रशांत चव्हाण, उमाकांत पिंपळापुरे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.शाळेच्या या उत्तुंग यशामुळे परिसरातुन विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

