राजेश वरटकर
मुख्य संपादक
वर्धा: सालोड येथील श्री जागृत शनि मंदिर देवस्थान येथे शनिदेव जन्मोत्सवानिमित्त १६ मे २०२६ रोजी भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुलगाव बायपास रोडवरील शनीधाम परिसर भक्तिमय वातावरणाने सज्ज झाला असुन आकर्षक शृंगार, छप्पन भोग आणि महाअभिषेक हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत.
शनिवार, ज्येष्ठ कृष्ण पक्ष शनि अमावस्या निमित्त पहाटे ५ वाजल्यापासून मंगल स्नान, पंचामृत स्नान व तेलाभिषेकाला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर गणेश पुजन, शिवपुजन, नवग्रह पुजन तसेच शनि शांती यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता कीर्तन तर रात्री १२ वाजता जन्म आरती होणार असून सायंकाळी ६ वाजल्यापासुन महाप्रसादाचे वितरण सुरू राहणार आहे.
उत्सवानिमित्त भाविकांना शनिदेवाच्या दर्शनासोबत विविध धार्मिक विधींचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच यावर्षीच्या राशी भविष्याबाबतही विशेष मार्गदर्शन पत्रिकेत देण्यात आले असून शनीच्या साडेसाती व ढैय्या संदर्भातील माहिती भाविकांचे लक्ष वेधुन घेत आहे.
कार्यक्रमाचे आयोजन श्री महर्षि भृगु ज्योतिष कार्यालय यांच्या सहकार्याने करण्यात आले.
