राजेश वरटकर
मुख्य संपादक
सेलु, दि. ५ जुन : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बेलगाव-धानोली येथील उत्तर वाहिनी तीर्थक्षेत्रावर असलेल्या स्वयंभू सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमास सामाजिक वनीकरण विभागाच्या
सारिका वैरागडे, वनपरिक्षेत्र अधिकारी (लागवड अधिकारी), अरुण जायभाये (वनपाल), विशाल बावणे (वनरक्षक), प्रफुल येलेकर (लिपिक, सामाजिक वनीकरण विभाग, सेलू) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच लोकमतचे तालुका प्रतिनिधी प्रफुल्ल लुंगे, सौ. सुवर्णा लुंगे, कांता तलवारे, सुगंधा तळवेकर, आरती लुंगे, वैशाली लुंगे, ललिता लुंगे, मुक्ता लुंगे व रेखा पिंपळकर यांनीही सहभाग नोंदविला.
यावेळी बांबु ,जांभुळ, पेरू, सागवान, निंबु व आंबा या विविध वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाबरोबरच पर्यावरण संरक्षण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व उपस्थितांना पटवुन देण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक वनीकरण विभागाचे मजूर अभय वासे व यशवंत वाळके यांनी विशेष परिश्रम घेतले. पर्यावरण संवर्धनासाठी वनविभागाने राबविलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले.

