तालुका प्रतिनिधी
सेलु (वर्धा),
तालुक्यातील वडगाव खुर्द येथे ख-र्याची पन्नी टाकण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने रविवारी रात्री हिंसक वळण घेतले. या घटनेत साहिल सातपुते (वय २३) या तरुणावर चाकुने सपासप वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला असुन त्याच्यावर नागपुर येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
माहितीनुसार, शनिवारी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घरासमोर पन्नी टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातुन मंगेश पिंजरकर (४०)नामक आरोपीने संतापाच्या भरात साहिलवर कटरने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या साहिलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला. हल्ल्यामागील नेमके कारण, आरोपीची भुमिका आणि इतर संबंधित बाबींचा तपास सुरू असुन आरोपीने स्वतः पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती आहे.
या घटनेमुळे वडगाव खुर्द परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडुन होत आहे.
