शहर प्रतिनिधी
हिंगणघाट
श्री. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंगणघाट येथील मांडा शिवाजी पार्क येथे शनिवारी भक्तिमय वातावरणात १०८ हनुमान चालीसा पठण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे संयोजन जीवन उरकुडे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणुन वर्धा येथील वरिष्ठ आरोग्य सल्लागार सौ. ज्योती ढगे (वेलनेस) उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. धार्मिक उपक्रमासोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमात अनेक कार्यकर्ते, भाविक व नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. सामुहिक हनुमान चालीसा पठणामुळे परिसर भक्तिमय झाला असुन उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाचा संदेशही दिला.
