शहर प्रतिनिधी
सेलु
सेलू (वर्धा) : शहरातील आठवडी भाजीबाजारात मंगळवारी सायंकाळी सेलु येथील महिला व घोराड येथील तरुण या दोन व्यक्तींमध्ये किरकोळ कारणावरून शाब्दिक वाद झाला. काही काळ वातावरण तणावपुर्ण झाले होते. मात्र, तेथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या रविन्द्र वानखेडे नामक होमगार्ड जवानाने तत्परता दाखवत दोघांनाही समजावुन सांगितले आणि वाद वाढण्यापुर्वीच मिटविला.
बाजारात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असल्याने काही वेळ गोंधळाचे वातावरणन निर्माण झाले होते. होमगार्डने संयमाने हस्तक्षेप करत दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून घेतले व त्यांच्यात समझोता घडवुन आणला. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि बाजारातील व्यवहार सुरळीत सुरू राहिले.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी होमगार्डच्या प्रसंगावधानाचे कौतुक केले. गर्दीच्या ठिकाणी वेळेवर हस्तक्षेप केल्यामुळे संभाव्य अनुचित घटना टळल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. सेलूच्या आठवडी बाजारात कायदा व सुव्यवस्था राखण्यात होमगार्डने बजावलेली भुमिका उल्लेखनीय ठरली.
