विशेष प्रतिनिधी
वर्धा
वर्धा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात खासदार अमर काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, समाजात वृद्धाश्रमांची वाढ ही कुटुंब व्यवस्थेच्या ऱ्हासाचे प्रतीक असुन समाजाला लागलेली कीड आहे. शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ नोकरी मिळवणे नसुन चांगला, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक घडवणे हे असले पाहिजे, असे त्यांनी नमुद केले.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल आणि सोशल मीडियाचा संयमाने वापर करण्याचा सल्ला दिला. व्यसनांपासून दुर राहुन पालकांचा सन्मान करावा, तसेच समाजाप्रती कर्तव्याची जाणीव ठेवावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
