*हार गळ्यात… कामांचा डोंगर पाठीवर!*
शिक्षक दिनी ‘गुरू’चा गौरव; वर्षभर मात्र अशैक्षणिक कामांचा भार
*राजेश वरटकर*
मुख्य संपादक
आज शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या गळ्यात फुलांचे हार पडतील, त्यांचा गौरव होईल आणि त्यांना समाजाचे शिल्पकार म्हटले जाईल. मात्र, या सन्मानाच्या झगमगाटामागे आजच्या शिक्षकांचे वास्तव वेगळेच आहे.
विद्यार्थ्यांना ज्ञान देणारा शिक्षक आज विविध सरकारी पोर्टल, माहिती भरणे, प्रशासकीय कामे आणि इतर अशैक्षणिक जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबला आहे. अनेक ठिकाणी शिक्षक कमी आणि डेटा एंट्री ऑपरेटर व लिपिक अधिक झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
रिक्त शिक्षक पदे, वाढता कामाचा ताण आणि अपुऱ्या सुविधा यामुळे शिक्षण व्यवस्थेसमोर गंभीर प्रश्न उभे ठाकले आहेत.
*
शिक्षकाला खऱ्या अर्थाने सन्मान द्यायचा असेल तर त्याला अशैक्षणिक कामांतुन मुक्त करून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे.
हार गळ्यात घालण्यापेक्षा शिक्षकाला ज्ञानदानासाठी मुक्त करा, हीच शिक्षक दिनाची खरी भेट ठरेल!

