घोराड | प्रतिनिधी
श्री क्षेत्र घोराड येथील जागृत जगदंबा माता मंदिरात आज सायंकाळी ५ वाजल्यापासून भव्य महाप्रसाद वितरणाला प्रारंभ झाला असुन हा सोहळा रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहे.
श्री संत केजाजी महाराज मंदिराच्या मागे असलेल्या या जागृत मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आली होती. परंपरेनुसार दरवर्षी त्रयोदशीला महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
मंदिरात दररोज सकाळी ६ आणि रात्री ७ वाजता होणाऱ्या आरतीला महिला भाविकांची मोठी गर्दी होते.
केळीच्या पानावर महाप्रसादाचा लाभ
भाविकांना केळीच्या पानावर दाळ-भाजी, भात, पोळी महाप्रसाद म्हणुन वितरीत करण्यात येत आहे.
या सोहळ्यासाठी गावातील नागरिकांनी तन-मन-धनाने सहकार्य केले आहे. प्रसाद तयार करण्यासाठी महिला मंडळ, तर वितरणासाठी तरुण वर्ग, तरुणी आणि चिमुकले स्वयंसेवक म्हणुन सेवा देत आहेत.
उद्या कोजागिरी पौर्णिमेला खिरापत वाटपानंतर उत्सवाची सांगता होणार आहे.

