सेलू.(ता. प्र.): केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी परीक्षेचा निकाल १५ एप्रिल रोजी दुपारनंतर जाहीर करण्यात आला. अनपेक्षितपणे निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थी व पालकांची एकच धावपळ उडाली. या निकालात सेलु येथील तृणाल रवींद्र वांदिले याने ९८.०८ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
तृणाल हा मुंबई येथील Ryan International School, Kandivali East, Mumbai येथे शिक्षण घेत होता. अत्यंत मेहनत, सातत्यपूर्ण अभ्यास आणि चिकाटीच्या जोरावर त्याने हे यश मिळविले.
आपल्या यशाबद्दल बोलताना तृणालने पुढे अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली असुन त्याची मोठी बहिणही आयआयटी पवई मुंबई येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. त्याचे वडील रविन्द्र वांदिले हे चंद्रपुर येथे वीज वितरण विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
तृणालच्या या यशामुळे आज शुक्रवारी ता. १७ ला त्याचे अनेकांनी अभिनंदन केले. सेलु शहरासह परिसरात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या यशाचे श्रेय त्याने शाळेतील शिक्षक तसेच आई-वडिलांना दिले आहे.

