बेफाम वेग, निष्काळजीपणा आणि प्रशासनाचा सुस्तपणा; ११ निर्दोषांचा होरपळुन अंत*
वाराणसी-रीवा महामार्गावर बुधवारी रात्री मृत्युने अक्षरशः थैमान घातले! नियंत्रण सुटलेल्या भरधाव ट्रकने बोलेरो, कार आणि कंटेनरला जबरदस्त धडक देत ११ निष्पाप नागरिकांना जिवंत जाळले. या भीषण घटनेने संपुर्ण परिसर हादरला आहे.
धडक इतकी जबरदस्त होती की बोलेरोला क्षणार्धात आग लागली. आगीने विक्राळ रूप धारण केल्याने आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. मदतीसाठी आक्रोश होत असतानाच ज्वाळांनी सर्वांना गिळंकृत केले.
या अपघातात बोलेरोतील प्रवासी, कारमधील दोन जण आणि ट्रकमधील एक अशा एकूण ११ जणांचा करुण अंत झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर बराच वेळ अग्निशमन दल पोहोचलेच नाही! तोपर्यंत लोक जिवंत जळत होते-हीच खरी शोकांतिका!
प्राथमिक तपासात ट्रकचा बेफाम वेग आणि चालकाची निष्काळजीपणा स्पष्ट झाला आहे. मात्र प्रश्न कायम-अशा ‘मृत्यूच्या ट्रक’ना रस्त्यावर मोकाट सोडणाऱ्यांवर कारवाई कधी होणार?
निर्दोषांचा बळी घेणाऱ्या या रक्तरंजित अपघाताला जबाबदार कोण?
प्रशासन अजुन किती बळी घेणार आहे?

