सेलू: वैद्यकीय शास्त्राला आव्हान
देणाऱ्या आणि दुर्धर आजार मंत्रोपचाराने बरे करतो, असे खोटे दावे करणाऱ्या भोंदु बाबांचा उच्छाद पुन्हा एकदा वाढला आहे. शहरातील कॅन्सरग्रस्त व्यक्तीला आजार बरा करण्याच्या नावाखाली चक्क १ लाख ८० हजार रुपयांनी गंडविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमरदीप शास्त्री, अरुण जोशी महाराज (दोन्ही रा. वाशिम) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रेमदास विठ्ठल अवचट (५०) यांच्या डाव्या जबड्याला कॅन्सर असून त्यांना पाहिजे तसा आराम होत नसल्याने त्यांनी ही बाब त्यांच्या मोठ्या भावाला सांगितली. नाशिकचे दोन पजारी आहेत तेव्हा मोठ्या भावाने
२५ मे २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता दोन भोंदुना घरी घेऊन आले. दोघांनी प्रेमदासला तुम्हाला दाढीचा कॅन्सर असुन तुमचा त्रास दुर करण्यासाठी तुमच्या पत्नीच्या अंगावर असलेले दागिने पाहिजे, असे म्हटले.
दरम्यान, प्रेमदासच्या पत्नीने तिच्या कानातील टॉप्स, सोन्याची अंगठी, सोन्याची पोत असे दागिने काढुन दिले. तसेच ३० हजार रुपये रोख ऑनलाइनद्वारे पाठविले. आराम न पडल्याने आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याप्रकरणी सेलु पोलिसांत तक्रार दिली.
भोंदुगिरीचे पेव सध्या चांगलेच फोफावले आहे. नागरिकांनी अशा भोंदुपासुन सावध राहावे.
पोलिसांकडुन आवाहन
कोणताही आजार केवळ औषधोपचार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बरा होऊ शकतो. मंत्र-तंत्राच्या किंवा अघोरी प्रथेच्या मागे लागुन आपली आर्थिक आणि मानसिक लुट होऊ देऊ नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

