सेलु: तालुक्यातील हिंगणी येथील यशवंत विद्यालयाची विद्यार्थिनी पुजा मुडे हिचा विद्यालयाच्या वतीने सोमवारी सकाळी भव्य सत्कार करण्यात आला.तालुक्यातील
यशवंत विद्यालय हिंगणी येथे वर्षभर विविध स्पर्धात्मक परीक्षेचे आयोजन केले जाते. तसेच स्कॉलरशिप यासारख्या परीक्षांचे महत्त्व पटवुन देऊन जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी परीक्षांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केल्या जाते. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षकाकडुन विशेष मार्गदर्शन करण्यात येते.
NMMS या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये वर्ग आठवीच्या तेरा विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. बहुतांश विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले परंतु वर्ग आठ वी ची विद्यार्थिनी कुमारी पुजा नरेश मुडे हिची स्कॉलरशिप मिळण्याकरिता निवड झाली.त्यानिमित्त कुमारी पुजा मुडे हिचा आज दि.
२७ एप्रिल रोजी मा.
मुख्याध्यापक नंदकिशोर श्रीधर ठाकरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तिने मनोगतामध्ये या यशाचे श्रेय यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. समीर भाऊ देशमुख, जनरल सेक्रेटरी सन्मा. डॉ. श्री. किशोर अहेर आणि
मुख्या. श्री.नंदकिशोर ठाकरे तसेच सर्व शिक्षक यांना दिले,
या सत्कार कार्यक्रमाला श्री ढवळे सर, श्री लोहकरे सर, श्री इंगोले सर, श्री ढुमणे सर, श्री घोंगडे सर, सौ गोसावी मॅडम, श्री हुलके सर, श्री चौधरी सर कुमारी बारापात्रे मॅडम, कुमारी मलेवार मॅडम, श्री डाखोळे सर, श्री बुध बावरे सर, श्री काळे बाबुजी, श्री सतीश तेलरांधे,श्री मयुर देवढे, वैद्य भाऊ, दुष्यंत चहांदे उपस्थित होते. सर्वांनी पुजा मुडे हिचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

