सेलुत ७दिवस भक्तिरसाची अखंड धार!
विशेष प्रतिनिधी
सेलू (वर्धा): धर्म, संस्कृती आणि भक्तिभावाचा संगम अनुभवण्यासाठी सेलु नगरी सज्ज झाली आहे. श्रीमद् भागवत आयोजन समितीच्या वतीने प्रभाग क्र. १, जयस्वाल ले-आऊट येथील अंगणवाडी मैदानात ‘श्री देवी भागवत महाकथा व ज्ञानयज्ञ सोहळा (प्रथम पर्व)’ भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. २९ एप्रिल २०२६ पासुन सुरू होणारा हा आध्यात्मिक महोत्सव ७ मे २०२६ पर्यंत रंगणार आहे.
उद्घाटनात आध्यात्मिक तेजाची प्रज्वलन
या ज्ञानयज्ञाचा शुभारंभ २९ एप्रिल रोजी सायंकाळी ६:३० वाजता होणार असुन, गुरुवर्य सयाजी महाराज भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कथेचे मंगल उद्घाटन केले जाणार आहे.
स्नेहगंगा श्रीजींच्या वाणीतुन देवी महिमा
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रख्यात भागवताचार्य ह.भ.प. सुश्री स्नेहगंगा श्रीजी, ज्या आपल्या सुमधुर आणि प्रभावी शैलीतुन देवी भागवत कथेचे अमृतमय निरूपण करणार आहेत. त्यांच्या प्रवचनातुन भक्तांना अध्यात्म, संस्कार आणि जीवनमुल्यांचा गुढ अर्थ उलगडणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती
उद्घाटन सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असुन, त्यामध्ये
विजय कोंबे, अंबिका हिंगमिरे, पत्रकार रविभाऊ कोटंबकार, प्रफुलभाऊ लुंगे, नरेंद्रभाऊ अग्रवाल, देवेंद्रजी ठाकुर, शैलेंद्रजी दफ्तरी, चुडामण हांडे आणि सुरेंद्रसराफ यांचा समावेश आहे.
कार्यक्रम तपशील
कालावधी: २९ एप्रिल ते ७ मे २०२६
उद्घाटन: २९ एप्रिल, सायं. ६:३०
स्थळ: अंगणवाडी मैदान, जयस्वाल ले-आऊट, सेलु(जि. वर्धा)
आयोजन समितीने सर्व भाविक भक्तांना या भव्य आणि मंगलमय ज्ञानयज्ञात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
सेलु नगरीत भक्तिरसाची गंगा वाहणार… तुम्हीही या दिव्य सोहळ्याचे साक्षीदार व्हा!

