NH-361 महामार्गावर अनोळखी महिलेचा मृतदेह; परिसरात खळबळ
शिवशाही न्युज नेटवर्क
सेलु
नागपुर-वर्धा मार्गावरील NH-361 महामार्गावर हळदगाव टोल नाक्याजवळील जित धाब्याच्या परिसरात एका अनोळखी महिलेचा जखमी अवस्थेत मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे रविवारी (२३ ऑगस्ट) मध्यरात्रीच्या सुमारास ही महिला महामार्गाच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेली आढळुन आली. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या शोधपत्रिकेनुसार, २४ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १२.२० वाजता जित धाब्याजवळ एक अनोळखी महिला जखमी अवस्थेत पडलेली असल्याची माहिती हेल्पलाईनवरून देण्यात आली. माहिती मिळताच तिला रुग्णवाहिकेने सेलु येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नसुन तिचे वय अंदाजे ५५ वर्षे असल्याचे पोलिसांनी नमुद केले आहे. महिलेचा रंग गहुवर्णीय, बांधा सडपातळ, उंची अंदाजे पाच फुट असुन तिने अंगात गुलाबी रंगाचा ब्लाऊज, पिवळ्या व लाल रंगाची साडी तसेच गुलाबी रंगाचे पेटीकोट परिधान केले होते. गळ्यात पाचूच्या रंगाचे मण्यांचे मंगळसुत्र व काळा धागा, डाव्या डोळ्याच्या वर तीळ आणि उजव्या हातात धागा असल्याचे वर्णन पोलिसांनी दिले आहे.
या प्रकरणी सेलु पोलिस ठाण्यात मर्ग क्रमांक ००/२०२६, कलम १९४ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ अन्वये नोंद करण्यात आली आहे. मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडुन तिच्या नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे. मृतदेहाची ओळख पटल्यास पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण एम. भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असुन, नागरिकांना या वर्णनातील महिला बेपत्ता असल्याची माहिती असल्यास सेलू पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क : सेलू पोलीस ठाणे – ०७१५५/२२०२३३

