वडीलांसह दोन निष्पाप मुलींचा बळी, प्रशासन झोपेत?
वर्धा नदी पुन्हा ठरली जीवघेणी!
जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपुर
चंद्रपुर जिल्ह्यातील घुग्घुस-धानोरा घाटावर घडलेल्या भीषण घटनेने संपुर्ण विदर्भ हादरला आहे. आंघोळीला गेलेले वडील आणि त्यांना वाचवायला धावलेल्या दोन चिमुकल्या—तिघांचाही बुडून मृत्यु! पण मोठा प्रश्न एकच—ही दुर्घटना की प्रशासनाच्या निष्काळजीपणाची किंमत?
सुरक्षेचा पुर्ण बोजवारा – घाटावर कोणतीही व्यवस्था नाही!
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या घाटावर ना इशारा फलक, ना सुरक्षा दोर, ना बचाव पथक! पाण्याची खोली किती, धोका किती—याची कुठलीही माहिती नाही.
मग जबाबदार कोण?
वडिलांना वाचवताना मुलींचा मृत्यु– हृदय पिळवटणारी शोकांतिका
हरिचंद्र कोडापे (४०) आंघोळीसाठी नदीत उतरले आणि खोल पाण्यात अडकले. त्यांना वाचवण्यासाठी १२ वर्षांची मुलगी अर्पिता आणि १४ वर्षांची भाची प्रियांका नदीत झेपावल्या.
पण निष्काळजी व्यवस्थेने तिघांचाही जीव घेतला!
घटना घडली, मगच प्रशासन जागे झाले!
घटना झाल्यानंतरच पोलिस आणि रेस्कु पथक हलले. सकाळी तिन्ही मृतदेह पाण्यावर तरंगताना सापडले.
प्रश्न असा—घटना टाळण्यासाठी आधी काय केले होते?
जनतेचा संताप उसळला
या घटनेनंतर स्थानिकांमध्ये तिव्र संताप व्यक्त होत आहे. “प्रत्येक वर्षी असे अपघात होतात, तरीही प्रशासन डोळेझाक का करते?” असा सवाल नागरिक करत आहेत.
हे अपघात नाहीत, ही थेट ‘व्यवस्थेची हत्या’ आहे!
नदी घाटांवर सुरक्षेची किमान साधनेही नसताना नागरिकांचा जिव धोक्यात घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?
की आणखी बळी गेल्यावरच प्रशासन जागे होणार?
आता तरी नदी घाट सुरक्षित करणार का, की अजुन किती जीव जाणार?

