विविध बँकांचे एटीएम कार्ड, मोबाईल, कारसह तब्बल ५ लाख १७ हजारांची रोकड जप्त
राजेश वरटकर
मुख्य संपादक
सेलू पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात आरोपीचा शोध घेत धडाकेबाज कारवाई करत हरियाणा राज्यातील एका आरोपीला नागपुर येथुन जेरबंद केले. सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढत ही कारवाई केली.
दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या वर्णनाशी मिळताजुळता एक व्यक्ती नागपूर येथील हुडकेश्वर नाका परिसरात पांढऱ्या रंगाच्या कारने फिरत आहे. माहितीची खातरजमा करून सेलु पोलिसांचे पथक तातडीने नागपूरकडे रवाना झाले.
पोलिसांनी नागपुर येथे सापळा रचुन संशयित अजहरुद्दीन ताहिर हुसेन (वय ३६), रा. टोंका, ता. हथीन, जि. पलवल, हरियाणा याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी व तपासणी केली असता विविध बँकांचे एटीएम कार्ड, गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची कार, मोबाईल तसेच फसवणुकीतुन मिळविलेली ५ लाख १७ हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या कारवाईमुळे सेलु पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान यशस्वीपणे पेलले असुन, गुन्हेगार कितीही दुर पळाला तरी कायद्याच्या कचाट्यातुन सुटका नाही, असा संदेश या कारवाईतून मिळाला आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, आयपीएस, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली सेलु पोलिस ठाण्याचे ठाणेदार पंकज वाघोडे तसेच अंमलदार मनोहर मुडे, अखिलेश गव्हाणे, सचिन वर्तखे, विनायक गोडे व ओमप्रकाश तल्हारी यांनी केली.

