राजेश वरटकर
मुख्य संपादक
परसोडी-सिंदी परिसरात प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहणामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. शासनाकडुन जाहीर करण्यात आलेला २४ लाख रुपये प्रति एकर दर अन्यायकारक असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, ही जमीन भविष्यात औद्योगिक आणि व्यावसायिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे या भागाचे मुल्य मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचा दावा केला जात आहे.
दरम्यान, अनेक शेतकरी आता कायदेशीर मार्ग स्वीकारत असुन एमआयडीसी कायद्यातील तरतुदीनुसार लेखी आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गावागावात बैठका घेऊन पुढील रणनीतीही ठरवली जात आहे.
शेतकरी प्रतिनिधींनी स्पष्ट सांगितले की,
“योग्य मोबदला आणि न्याय मिळाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही.”
तसेच, केवळ आर्थिक मोबदल्याऐवजी विकसित भुखंड देण्याची मागणीही जोर धरत आहे. परिसरात शेतकऱ्यांची एकजुट वाढताना दिसत असुन, पुढील काही दिवसांत हा मुद्दा अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“हा संघर्ष विकासाविरोधात नाही, तर शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आहे”

