शुक्रवारी किर्तन
श्री क्षेत्र घोराड येथील
श्री शनैश्वर चॅरीटेबल ट्रस्ट तथा श्री संत केजाजी महाराज हरिपाठ मंडळ घोराड यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शनि मंदिर देवस्थान घोराड येथे “श्री शनिदेव जयंती उत्सव २०२६” चे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १५ मे २०२६, शुक्रवार रोजी सायंकाळी ७ ते १० या वेळेत ह.भ.प. विनोदाचार्य रमेश महाराज दुधे यांचे सुश्राव्य किर्तन आयोजित करण्यात आले आहे.
तसेच दिनांक १६ मे २०२६, शनिवार रोजी सकाळी ६वाजता अभिषेक, महापुजा तसेच तेलाभिषेक दुपारी चार वाजता काल्याचे भजन व काला वितरण तसेच सायंकाळी ७ ते १० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असुन भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडुन करण्यात आले आहे.
मंदिर निर्माण कार्य व महाप्रसादासाठी तन-मन-धनाने सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

