शहर प्रतिनिधी
सेलु
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ब्रह्माकुमारीज् भगत ले- आउट सेलू द्वारे बाल संस्कार शिबिर दिनांक १७मे ते २१मे२०२६ पर्यंत आयोजित केलेले आहे. या संस्कार शिबिराचे उद्देश्य , मुलांना भविष्यात येणाऱ्या घडामोडींमध्ये कसे समोरी जावे याबद्दल विशेष मार्गदर्शन मिळावे असे आहे.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मुलांमध्ये गंमती-जमती द्वारे सुसंस्कार घडविणे,ध्यान साधने द्वारे एकाग्रता व बुद्धिमत्ता कशी वाढवावी, मोबाईलचा सदुपयोग करणे, वडीलधाऱ्यांचा आदर करने अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन देण्यात येईल. तसेच सामुहिक खेळातुन बुद्धिमत्तेचा विकास, नृत्य, वेगवेगळ्या कला देखील शिकविण्यात येईल. या कार्यक्रमाचा लाभ मुलांसोबतच पालकांनी सुद्धा घ्यावा असे आवाहन ब्रह्माकुमारीज् सेलुच्या संचालिका दर्शना दीदी यांनी केले आहे. *या करिता पालकांनी आपल्या पाल्याचे नाव खालील registeration लिंक वर नोंदवावी https://forms.gle/zkJs1tQDVMA2yyip6*

