श्री शनी मंदिर घोराड येथे शनी अमावास्या व शनी जयंती महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते. विदर्भातील दुसरे पंढरपूर म्हणुन ओळख असलेल्या घोराड येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
शुक्रवारी रात्री आयोजित विनोदाचार्य रमेश महाराज दुधे पाळोदी यवतमाळ यांच्या पंचरंगी किर्तनाने भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या पंचरंगी किर्तनाने भाविकांच्या उत्साहात भर पडली असुन त्यांनी आपल्या निर्मळ वाणीतुन अनेक हास्य प्रसंग सांगुन उपस्थित भाविकांना पोट धरून हसायला लावले, यावेळी उपस्थित भाविकही हास्याने लोटपोट झाले.शनिवारी शनी जयंती निमित्त पहाटे महापुजा,तेलाभिषेक करून उत्सवाची सुरुवात झाली.दुपारी काल्याचे भजन व नामस्मरणाने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. शनिवारी सकाळपासुन अभिषेक महापुजा, काला, भजन संध्या तसेच भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शनी जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची आकर्षक रेलचेल पाहायला मिळाली. सायंकाळी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी पद्मश्री राधे, मनोज पायघण व संच यांच्या सुमधुर भजन संध्याने भाविकांना मंत्रमुग्ध केले.संपुर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शनैश्वर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष निवृत्ती तडस, उपाध्यक्ष सुधाकर खराबे, सहसचिव विठोबाजी पिसे, भैय्या ढोले सदस्य गणेश खोपडे, राजेश वरटकर, दिवाकर माहुरे, राजेन्द्र माहुरे, रामाजी भांदककर, सत्यपाल उईके,रवि भुरे, ईश्वर धुर्वे,राजु धोंगडे,गोलु मांढरे, विलास माहुरे,बंडु तडस, दिलीप पोहाणे, विलास खराबे, रामदास माहुरे,शुभम खराबे, गजानन केळवदे,सौ.मालाबाई मांढरे,सुदाम गुजरकर, प्रशांत ईखार यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच ग्रामस्थांनी सहकार्य करीत कार्यक्रम यशस्वी पार पाडला.मंदिर परिसरात भक्तीमय व उत्साहपुर्ण वातावरण निर्माण झाले होते.सेलु तालुक्यातील एकमेव शनी मंदिर असल्याने दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती तसेच परिसरातील भाविकांची मोठी उपस्थिती होती.
तालुक्यातील एकमेव असलेल्या शनी मंदिरात बाहेर गावावरून आलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

