विशेष प्रतिनिधी
नागपुर
नागपुर : विदर्भात वाढलेल्या प्रचंड उष्णतेचा परिणाम आता शहरातील रस्त्यांवरही दिसु लागला आहे. शहरातील एका उड्डाणपुलाखालील मार्गावर रस्त्यामध्ये बसवण्यात आलेले lane reflectors अर्थात “Cat Eyes” मोठ्या प्रमाणात उखडुन रस्त्यावर पडल्याचे समोर आले आहे.
हे reflectors रात्रीच्या वेळी वाहनचालकांना lane ची दिशा स्पष्ट दिसावी आणि अपघात टाळता यावेत यासाठी बसवले जातात. मात्र गेल्या काही दिवसांपासून नागपुरात तापमान सतत ४४ ते ४६अंशांच्या आसपास पोहोचत असल्याने डांबर मोठ्या प्रमाणात तापले आहे. त्यामुळे reflectors चिकटवण्यासाठी वापरण्यात आलेले adhesive वितळुन ते रस्त्यावरून निघत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे हा रस्ता flyover खालील वळणदार भागात असल्याने येथे वाहनांचा वेग तुलनेने जास्त असतो. अशा परिस्थितीत रस्त्यावर पडलेले हे reflectors वाहनांसाठी धोकादायक ठरू शकतात. दुचाकीस्वारांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन स्थानिकांकडुन करण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने या भागाची दुरुस्ती करून नवीन आणि मजबुत reflectors बसवावेत अशी मागणी केली आहे. उन्हामुळे शहरातील रस्त्यांची गुणवत्ता आणि वापरण्यात येणाऱ्या साहित्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
वाहनचालकांनी रात्रीच्या वेळी सावधगिरी बाळगावी, वेग मर्यादेत ठेवावा आणि वळणांवर विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

