राजेश वरटकर
मुख्य संपादक
सेलु तालुक्यातील झडशी येथे एका इसमाचा संशयित उष्माघाताने मृत्यु झाल्याची घटना उघडकीस आली असुन, मृत व्यक्तीची ओळख अशोक दादाजी चौधरी (वय ६२) अशी करण्यात आली आहे. त्यांचा मृतदेह गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वऱ्हाड्यात आढळुन आल्याने परिसरात खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक चौधरी हे गावात एकटेच वास्तव्यास होते. त्यांची पत्नी व मुलगा हे परगावी राहत असल्याने ते एकटे राहत होते. दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासुन ते कुणाच्या नजरेस पडले नव्हते. आज परिसरात दुर्गंधी पसरू लागल्याने नागरिकांना संशय आला. नागरिकांनी पाहणी केली असता प्राथमिक शाळेच्या वऱ्ह्यांडात त्यांचा मृतदेह आढळुन आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेहाची अवस्था व जिल्ह्यातील सध्या सुरू असलेली तिव्र उष्णतेची लाट लक्षात घेता उष्माघातामुळे मृत्यु झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेमुळे झडशी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असुन, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभुमीवर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, उन्हात बाहेर पडणे टाळावे तसेच पुरेसे पाणी पिण्याचे आवाहन प्रशासनाकडुन करण्यात येत आहे
