राजेश वरटकर
मुख्य संपादक
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या बोंडगाव/देवी येथे मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या शेजारी राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना खेळण्याच्या बहाण्याने घरी बोलावुन त्यांच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अल्पवयीन मुलाने दोन्ही मुलींना घरात बोलावुन त्यांच्याशी गैरकृत्य केले. घटनेची माहिती मुलींच्या पालकांना मिळताच त्यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीला ताब्यात घेतले असुन त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
विशेष म्हणजे अर्जुनी मोरगाव तालुका आधीच वन्यजीव-मानव संघर्षाच्या घटनांमुळे चर्चेत असताना आता या अमानुष घटनेने संपुर्ण जिल्हा हादरला आहे. नागरिकांकडुन आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पोलिस पुढील तपास करीत आहेत.

