जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपुर
चंद्रपुर जिल्ह्यात सध्या उष्णतेची तिव्र लाट सुरु आहे, यापासुन थंडावा मिळावा म्हणुन नागरिक आपल्या घरी कुलर लावत आहे, मात्र हा कुलर तुमचा जीव घेऊ शकतो अशी हादरविणारी घटना चंद्रपुर शहरात २८ मे रोजी घडली. कुलरमध्ये पाणी टाकताना बाप-लेकाचा विजेचा धक्का लागुन आज सकाळी १० वाजताच्या सुमारास मृत्यु झाला.
इंदिरानगरातील घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
चंद्रपुर शहरातील इंदिरानगर रेल्वे पटरी जवळ राहणारे वामन मांडवे हे सकाळी चालु कुलर मध्ये पाणी टाकत असताना त्यांना विजेचा जोरदार झटका बसला, वडील खाली पडल्याचे दिसताच मुलगा राहुल मांडवे वडिलांजवळ गेला असता त्याला सुद्धा विजेचा जोरदार धक्का लागला अशी माहिती आहे.
या धक्क्यात बाप-लेकाचा जागीच मृत्यु झाला,
बाप-लेकाच्या दुर्दैवी मृत्युने संपूर्ण परिसर हळहळुन गेला
उन्हाळा येण्यापुर्वी महावितरणने नागरिकांना विजेच्या धक्क्यापासुन आधीच सावध केले होते, कुलर ची वायरिंग ची बरोबर तपासणी करावी व चालु कुलर मध्ये पाणी टाकायच्या वेळेस कुलर बंद करणे अश्या सुचना महावितरणने दिल्या होत्या.

