शिवशाही न्युज नेटवर्क
सेलु.. स्वयंभु सिद्धेश्वर बहुउद्देशीय वारकरी संस्था बेलगाव धानोलीचे अध्यक्ष ह भ प गुरुवर्य वाल्मीकदादा भोयर महाराज यांचे हृदयविकाराने सेवाग्राम रुग्णालयात सोमवार (१ जुन )सकाळी निधन झाले.
त्यांचे पार्थिवावर श्री क्षेत्र उत्तर वाहिनी येथील स्वयंभु सिद्धेश्वर मंदिरासमोरील मोक्षधामात भजन दिंडी व टाळ मृदंगाच्या गजरात सोमवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ते आजन्म ब्रह्मनिष्ठ , संन्याशी व आध्यात्मिक भक्तिमार्गात निस्वार्थ भावनेने सेवा कार्य करीत होते. त्यांच्या वैराग्यवृतीने विदर्भात त्यांना मानणारा मोठा वर्ग होता . मोक्षधामात ह.भ.प.गुरुवर्य पुंडलिक महाराज बोळवटकर महाराज पंढरपुर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शोकसभेत वारकरी संप्रदायातील अनेकांनी श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या निस्वार्थ अध्यात्मिक सेवाकार्याचा गौरव केला.
त्यांचे पश्चात, भाऊ, पुतणे व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांचे लहान बंधु वर्धा बाजार समितीचे संचालक साहेबराव भोयर यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्णी दिला.
