*कार्यक्षेत्रातील गावांमध्ये मिळते दारु
गणेश खंते
प्रतिनिधी
खरांगणा(मो.)मदना— वर्धा जिल्ह्यात शासनाने दारु विक्रीला ५२ वर्षांपासुन बंदी घातली आहे. परंतु, येथील ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बहुतांश गावात हर रकारची दारु लीलया मिळते.
शासनाने १९७४ पासुन वर्धा जिल्हा राष्ट्र पित्याची व भुदान चळवळीचे प्रणेते विनोबा भावेयांची कर्मभुमी समजुन या जिल्ह्यात दारु बंदी लागु
केली. पण, ही दारुबंदी फक्त कागदांवरच आढळते. जिल्ह्यातील सर्वच ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सर्व प्रकारची दारु सहज मिळते. नाही म्हणायला अधून मधून दारुसाठा पकल्याच्या बातम्या येतात. नदीच्या किंवा नाल्यांच्या आडोशाने सरेआम दारु गाळणारे महाभाग पोलिसांच्याच आशीर्वादाने सक्रिय असतात, हे कटूसत्य आहे.
येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीत ७० पेक्षा जास्त गावांचा समावेश आहे. शेजारी धाम नदी आहे आणि नदीशी संलग्न नाल्यांच्या आडोशाने दारुच्या भट्ट्या लावणारे अनेक आहेत. शिवाय तळीरामांना हवे असलेले सामिष भोजन किंवा वस्तु येथे मोठ्या प्रमाणात मिळत असते. त्यामुळे दारु विक्रेत्यांची आणि पिणाऱ्यांची चंगळ आहे. अलिकडे या ठाण्यात कार्यरत पोलिस दादा दारु विक्रेत्यांना प्रोत्साहन देत असल्याचे बोलल्या जात आहे. रक्षकच भक्षक झाल्यामुळे खरांगणा आणि परिसरात पिणाऱ्यांची व दारु गाळणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. एखादी अप्रिय घटना घडल्याशिवाय पाकिट मणीची सोय बघणारे पोलिस दल त्यांचा बंदोबस्त करतील, अशी शक्यता तुर्तास तरी दिसत नाही.

