राजेश वरटकर
मुख्य संपादक
अधिक मासातील कमला एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधुन श्री श्याम धाम ट्रस्ट आणि श्री श्याम मित्र मंडळ वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ‘श्री श्याम संकीर्तन’ भजन संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. हा भक्तिमय सोहळा आज बुधवार, ११ जुन २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजल्यापासून प्रभु इच्छेपर्यंत रंगणार आहे.
हा भव्य संकीर्तन सोहळा श्री श्याम धाम, आदित्य नगरी, मुडे लॉन जवळ, वर्धा येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘करने वाले श्याम, कराने वाले श्याम’ या भावनेने संपुर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघणार आहे.
श्री श्याम धाम ट्रस्ट व श्री श्याम मित्र मंडळ वर्धा यांनी सर्व श्याम प्रेमी, भाविक भक्तांना या पावन पर्वावर आयोजित भजन संध्येला मोठ्या संख्येने उपस्थित राहुन श्री श्याम प्रभुच्या भक्तीचा लाभ घेण्याचे आणि संकीर्तनाची शोभा वाढवण्याचे आवाहन केले आहे.
नागपुरच्या निहारिका पुरोहित सजवणार स्वरमंच..
या भजन संध्येचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत नागपुर येथील प्रसिद्ध भजन गायिका निहारिका पुरोहित. त्यांच्या सुमधुर आणि भावपुर्ण आवाजातील श्याम भजनांनी श्रोते मंत्रमुग्ध होतील. त्यांच्या भजनांनी कमला एकादशीच्या पवित्र दिवशी भाविकांना श्याम नामाच्या रसात चिंब भिजण्याची अनुभुती मिळणार आहे.
जगभरातील भक्तांसाठी ‘लाइव्ह’ दर्शनाची सोय
ज्या श्याम प्रेमींना प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नाही, त्यांच्यासाठी ‘Sawariya Live Official’ (SL) यूट्युब चॅनेलवर या संपुर्ण संकीर्तनाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. त्यामुळे घरबसल्या जगभरातील भक्त या भक्तिरसाचा लाभ घेऊ शकणार आहेत.

