सेलू तालुक्यात आनंदाचे वातावरण;
ग्रामीण भागातील खेळाडूची मोठी झेप
शिवशाही न्युज नेटवर्क
सेलु:-सेलुशहरासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरणारी एक उल्लेखनीय कामगिरी समोर आली आहे. येथील सूर्यधरम स्पोर्टिंग क्लबची खेळाडु कु. यशस्वी नामदेव राठोड हिची पुणे येथील ‘खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रात’ (Khelo India State Centre of Excellence) प्रवेशासाठी निवड झाली आहे.महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत तसेच शिवछत्रपती क्रीडापीठ (म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे) यांच्या माध्यमातून नुकतीच राज्यस्तरीय कौशल्य चाचणी आयोजित करण्यात आली होती. ११ ते १९ मे २०२६ दरम्यान पार पडलेल्या या चाचणीमध्ये यशस्वीने आपल्या कौशल्याची आणि उत्कृष्ट कामगिरीची छाप पाडली. तिच्या या गुणवत्तेची दखल घेत निवड समितीने तिला खेलो इंडिया केंद्रासाठी पात्र ठरवले आहे. यासंदर्भात क्रीडा प्रबोधिनी, पुणे येथून अधिकृत पत्र प्राप्त झाले असून, तिला प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.कठोर परिश्रम आणि मार्गदर्शनाचे फळ:यशस्वी गेल्या चार वर्षांपासून सातत्याने आणि कठोरपणे खेळाचा सराव करत आहे.
ती सूर्यधरम स्पोर्टिंग क्लब, सेलु येथे मुख्य प्रशिक्षक सागर राऊत आणि समीर सय्यद यांच्या कसून मार्गदर्शनाखाली तयार झाली आहे. क्रीडा क्षेत्रात उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आधुनिक सुविधा आणि राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या ‘खेलो इंडिया’ उपक्रमात निवड होणे हे तिच्या उज्ज्वल क्रीडा कारकिर्दीचे पहिले मोठे पाऊल मानले जात आहे.
यशाचे श्रेय आणि अभिनंदन:यशस्वीने आपल्या या यशाचे श्रेय तिचे आई-वडील, प्रशिक्षक सागर राऊत, समीर सय्यद तसेच सूर्यधरम स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष रामप्रसाद लिल्हारे, प्रवीण इंगळे, प्रमोद नागोसे, प्रतीक पाटील, कैलास बिसेन, मयूर बोकडे, सुनील गौतम, प्रयास कोल्हे, आकाश नौकरकर, प्रीतम भांडेकर, सागर कटरे, राकेश रहाटे, शुभम धोटे, केतन डुकरे, रुपेश कुंबरे, गणेश देशमुख, संकेत पाटील. क्लबमधील सर्व सदस्य आणि जिल्हा क्रीडा अधिकारी अशा मेश्राम तालुका क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे . व्यवस्थापक रवी काकडे. वर्धा जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव रमेश बुटे यांना दिले आहे.ग्रामीण भागातील एका सामान्य विद्यार्थिनीने केवळ जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर मिळवलेल्या या यशामुळे संपुर्ण सेलु तालुक्यासह वर्धा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यशस्वीच्या या यशाबद्दल तिच्यावर सर्वच स्तरांतुन अभिनंदनाचा वर्षाव होत असून, ती भविष्यात राज्य आणि देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

