आज दि. १३जुन रोजी महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रातील राजकारणी असुन युवासेना प्रमुख तसेच विधिमंडळ नेते आहेत. त्यांची पर्यावरण विषयक आवड लक्षात घेता.देवळी येथील कौशल्य नगर येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांचे प्रमुख आणि सहकारी यांनी वृक्षारोपण चा कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी अंनता देशमुख आर्वी देवळी विधानसभा शिवसेना अध्यक्ष,मारोती दरणे शहर प्रमुख देवळी,संजय कपुर तालुका देवळी संघटक,विलास निवल माजी तालुका प्रमुख, आशिष डाहाके युवा तालुका अधिकारी, प्रमोद गुल्हाने युवा प्रमुख, सागर वरके उपशाखा प्रमुख,किशोर झापरापुरे शिवसैनिक, पवन आदमने शिवसैनिक आदींच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

