* पुनम प्रॉडक्शनचा भव्य उपक्रम; नागपूरच्या ‘7 वचन हॉल’मध्ये रंगला अंतिम सोहळा
* सेलु तालुक्यासह वर्धा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
राजेश वरटकर
मुख्य संपादक
पूनम प्रॉडक्शनच्या वतीने आयोजित अत्यंत प्रतिष्ठित आणि मानाच्या ‘मिस प्राईड ऑफ महाराष्ट्र – सीझन ६’
या सौंदर्य स्पर्धेचा महाअंतिम सोहळा रविवारी, १४ जुन रोजी नागपुर येथील ७ वचन हॉलमध्ये मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या अटीतटीच्या राज्यस्तरीय स्पर्धेत सेलु तालुक्याची सुकन्या कु. खुशाली सुरेश उमाटे हिने आपल्या अंगभुत कलागुणांच्या आणि आत्मविश्वासाच्या बळावर ‘द्वितीय उपविजेती’ (2nd Runner-Up) हा किताब पटकावला. तिच्या या यशामुळे संपुर्ण सेलु तालुक्यासह वर्धा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
पुनम प्रॉडक्शन आयोजित ही स्पर्धा महाराष्ट्रातील युवतींच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवुन देण्यासाठी ओळखली जाते. यंदाच्या ६ व्या सीझनमध्ये संपुर्ण महाराष्ट्रातुन शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यातुन विविध फेऱ्या पार करत अंतिम फेरीत पोहोचलेल्या सौंदर्यवतींमध्ये नागपुर येथे अंतिम मुकुटासाठी स्पर्धा रंगली. रॅम्प वॉक, बौद्धिक व व्यक्तिमत्त्व चाचणी आणि प्रश्नोत्तरांच्या कठीण फेऱ्या पार करत खुशालीने परीक्षकांची मने जिंकली आणि द्वितीय उपविजेती पदावर आपले नाव कोरले.
खुशाली सुरेश उमाटे ही सेलु तालुक्यातील असुन, तिच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातुन तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील मुलींनी योग्य संधी आणि कष्टाच्या जोरावर राज्य पातळीवर मिळवलेले हे यश इतर अनेक युवतींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
आपल्या या यशाबद्दल बोलताना खुशालीने आयोजकांचे आभार मानले. �

