सेलू, दि. १६ जुन : केळझर येथील ज्येष्ठ नागरिक तथा सामाजिक क्षेत्रात परिचित असलेले संतोषराव कवडुजी घवघवे यांचे मंगळवारी (१६ जून) सायंकाळी ५.४५ वाजता सेवाग्राम रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.
संतोषराव घवघवे हे परिसरात आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणुन ओळखले जात होते. ते दैनिक देशोन्नती चे तालुका प्रतिनिधी भारत घवघवे यांचे वडील होत.त्यांच्या निधनाने केळझर गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी तसेच नातवंडांसह मोठा आप्तपरिवार आहे.
त्यांच्यावर बुधवार, १७ जुन रोजी सकाळी ११ वाजता केळझर येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

