बोरी कोकाटे येथील घटना
प्रकाश मेसरे
बोरधरण प्रतिनिधी
बोरी कोकाटे येथील सुधाकर नत्थुजी आत्राम (वय ५०) यांनी आपल्या घरासमोरील झाडाला गळफास लावुन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असुन परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुधाकर आत्राम हे भुमिहीन असुन अत्यंत साधे जीवन जगत होते. त्यांनी घरासमोरील झाडाला गळफास लावुन जीवन संपविल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सेलु पोलिसांना कळविण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसुन पोलिसांकडुन अधिक तपास सुरू आहे.
या घटनेमुळे बोरी कोकाटे गावात शोक व्यक्त करण्यात येत असून, सुधाकर आत्राम यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

