शिवशाही न्युज नेटवर्क
यवतमाळ
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे २७ जुन रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडी आणि जिल्ह्यातील पक्ष संघटनेची स्थिती लक्षात घेता या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
अलीकडेच खासदार संजय देशमुख यांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याने शिवसेना (UBT) मध्ये काही प्रमाणात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. या पार्श्वभुमीवर उद्धव ठाकरे पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आणि स्थानिक नेत्यांशी संवाद साधण्यासाठी यवतमाळ दौरा करणार आहेत.
दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक, महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा तसेच जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. शेतकरी, शेतकरी आत्महत्या, सिंचन आणि स्थानिक प्रश्नांवरही उद्धव ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे.
पक्षातील अंतर्गत मतभेद मिटवुन संघटना अधिक मजबुत करण्याच्या दृष्टीने हा दौरा निर्णायक मानला जात असुन, कार्यक्रमाच्या वेळापत्रकाबाबतची अधिकृत माहिती लवकरच शिवसेना (UBT) संपर्क कार्यालयाकडुन जाहीर करण्यात येणार आहे.

