शिवशाही न्युज नेटवर्क
सेलु: तालुक्यातील काशिमपुर शेतशिवारातील शेषराव पाटील रा.बाबापुर या शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्याला आज दुपारी चार वाजताचे दरम्यान विज पडुन भिषण आग लागली. या आगीत गोठा पुर्णपणे जळुन खाक झाला असुन गोठ्यात साठवुन ठेवलेले मोठ्या प्रमाणातील खतही नष्ट झाले आहे.
आज दुपारी चार वाजताचे दरम्यान पावसाला सुरुवात झाली असतानाच विजेचा कडकडाट, वादळी वारा सुटला व पाऊसही आला.यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असताना काशीमपुर शिवारात असलेल्या गोठ्यावर विज पडली.आणि संपुर्ण गोठा जळुन खाक झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये एकुण २२ बॅग खताचा साठा ठेवण्यात आला होता. त्यामध्ये १३ बॅग युरिया, ६ बॅग पोटॅश, ४ बॅग सल्फर आणि २ बॅग मॅग्नेशियम खताचा समावेश होता. वीज पडल्याने अचानक आग लागुन काही क्षणांत संपुर्ण गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
या घटनेत शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असुन पेरणीच्या तोंडावर झालेल्या या नुकसानीमुळे संबंधित शेतकरी संकटात सापडला आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडुन करण्यात येत आहे.

