शिवशाही न्युज नेटवर्क
सेलु
सेलु: राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ईमामवाडा नागपुर आगारातील एका वाहकाने नागपुर–वर्धा बसमध्ये ज्येष्ठ प्रवाशाशी कथितपणे अश्लील व अरेरावीचे वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत असुन संबंधित वाहकावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २२जुन रोजी सकाळी १०वाजता नागपुरहुन वर्धा कडे जाणारी पर्यावरण पुरक ई-बस क्र.MH 49 BZ 4045सेलु बसस्थानकावर आली असता येथुन वर्धा येथे जाण्यासाठी नागरिकांनी बस मध्ये चढायची घाई केली त्यावेळी सेलु येथील च एक जेष्ठ व्यक्ती बस मध्ये चढत असताना ई-बस च्या वाहकाने बस मध्ये चढण्यास मनाई केली व अश्लील भाषेत फुकट ची बस आहे म्हणुन कुठेही कशाला फिरता असा प्रश्न उपस्थित केला, यावेळी त्या जेष्ठ व्यक्ती ने वर्धा येथील डोळ्यांच्या दवाखान्यात जायचं आहे तिन गाड्या गेल्या मात्र मला चढता आले नाही, मला बसमध्ये घ्या मात्र मुजोरी कायम ठेवत वाहक मनाई करीत गाडीत जागा नाही माझ्या गाडीची क्षमता नाही मागच्या गाडीत या नाही तर घरी जाण्याचा सल्ला दिला.यावेळी तिथे उपस्थित एका सुशिक्षित तरुणाने त्या वाहकाला विनंती केली व त्या जेष्ठ नागरिकांला बस मध्ये चढण्यास मदत केली.बस मध्ये गर्दी असल्यामुळे त्या जेष्ठ व्यक्ती ला वर्धा पर्यंत उभ्यानेच प्रवास करावा लागला.मात्र सदर वाहकाने त्या जेष्ठ व्यक्ती ला सिट ही उपलब्ध करून दिली नाही,उलट वाहकाच्या जागेवर कोणी बसु नये म्हणुन जागेवरुन च तिकीटा दिल्या या बद्दल तिथे प्रवास करणाऱ्या व्यक्ती ने हरकत घेतली असता वाहकाने अर्वाच्च भाषेचा वापर करीत तु कोण अधिकारी आहे का, मी भित नाही, तुला जे करायचे आहे ते कर अशी उर्मटपणे भाषेचा वापर केला.यावेळी तिथे उपस्थित विद्यार्थी चर्चा करीत होते की ही नित्याचीच बाब असुन वाहक नेहमीच मुजोरी करीत असुन वर्धा येथुन सेलु ला बस जात नाही म्हणुन कित्येकदा बस मधुन खाली उतरून दिल्या जात असल्याचे सांगण्यात आले.या बाबत वाहतुक नियंत्रण कक्षात तक्रार करण्यासाठी काही प्रवासी गेले असता कक्ष प्रमुख मेश्राम उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले.तिथे उपस्थित असणाऱ्या ईतर अधिका-यांनाही वेळ नसल्याचे सांगण्यात आले. बसमधील एका ज्येष्ठ व्यक्ती सोबत वाहकाने उद्धट भाषेत बोलत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण असुन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागपुर -वर्धा रोडवरील सर्व आगाराच्या वाहकाला सेलु येथे बसस्थानकावर बस नेण्याची तसेच जेष्ठ नागरिक, प्रवाशी व विद्यार्थी सोबत सौजन्याने वागणुक देण्याची मागणी केली आहे. अनेक प्रवासी अशा घटनांकडे दुर्लक्ष करतात, मात्र या प्रकारामुळे एसटी महामंडळाच्या प्रतिमेला धक्का बसत असुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडुन होत आहे.

