सेलू, प्रतिनिधी : अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा नाथपंथीय समाजातील युवा नेतृत्व म्हणुन ओळख असलेल्या सचिन दशरथ सावंत यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे नाथपंथी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असुन विविध स्तरातुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सचिन सावंत हे गेल्या अनेक वर्षांपासुन सामाजिक, शैक्षणिक आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. समाज संघटन, युवकांना दिशा देणे आणि नाथपंथी समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम केल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत महासंघाने त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.
त्यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रातील नाथपंथी समाजाच्या संघटनात्मक बळकटीसह समाजाच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी नवे नेतृत्व मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या निवडीबद्दल महासंघ युवक आघाडी, महाराष्ट्र राज्य तसेच समाजबांधवांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

