शिवशाही न्युज नेटवर्क
वर्धा
हिंगणघाट तालुक्यातील आजंती येथील सम्यक मनोज कायमकर (वय १७) यांच्या अकाली निधनानंतर खासदार अमर काळे यांनी कायमकर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. सम्यक यांचे १ मे रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले होते. अवघ्या सतराव्या वर्षी झालेल्या त्यांच्या निधनामुळे संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सम्यक हे मनोज कायमकर यांचे एकुलते एक पुत्र होते आणि नागपूर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते. आपल्या कष्टाच्या जोरावर मुलांना उच्च शिक्षण देणाऱ्या कायमकर कुटुंबासाठी सम्यक हे मोठे आधारस्तंभ होते. त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ही घटना समजल्यानंतर खासदार अमर काळे यांनी आजंती येथे जाऊन दिवंगत सम्यक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांनी सम्यक यांच्या आई-वडिलांचे सांत्वन करत या दुःखातुन सावरण्याचे बळ परमेश्वर त्यांना देवो, अशी प्रार्थना केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, बालु वानखेडे, प्रवीण जायदे, योगेश रडके, देवराव भोयर, बाळा मानकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. �

