पत्रकार,होमगार्ड, शिक्षक व विद्यार्थी धावले मदतीला
विशेष प्रतिनिधी
सेलु
सेलु, दि. ८ जुलै : वर्धा–नागपुर बायपासवरील सेलु पुलाखाली आज भरधाव वेगातील बस आणि प्लेजर स्कुटीची जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात स्कुटीवरील दोन तरुणी जखमी झाल्या. सुदैवाने पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी आणि होमगार्ड जवानांनी तत्परता दाखवल्याने त्यांना तातडीने उपचार मिळाल्याने मोठी दुर्घटना टळली.
अपघाताची माहिती मिळताच संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), सेलु येथे परीक्षा बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले गृहरक्षक रविन्द्र वानखेडे,शिक्षक व विद्यार्थ्यांनीही तत्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला.
दरम्यान, दैनिक साहसिक चे मुख्य संपादक रविभाऊ कोटंबकार यांनीही सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत जखमी मुलींना आपल्या वाहनातुन तातडीने ग्रामीण रुग्णालय, सेलु येथे दाखल केले. त्यामुळे जखमींवर वेळेत उपचार सुरू होऊ शकले.
ग्रामीण रुग्णालयात दोन्ही मुलींवर उपचार सुरू असुन त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
पत्रकार ,होमगार्ड, आयटीआयचे शिक्षक, विद्यार्थी आणि मदतीला धावुन आलेल्या नागरिकांनी दाखविलेली तत्परता, मानवता आणि सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. अपघाताचे नेमके कारण काय, याचा पुढील तपास सेलु पोलीस करीत आहेत.
