मुस्लिम समाजातील समाजसेविका व पत्रकार सादिया अख्तर यांचा संताप; पीडित कुटुंबास शेवटपर्यंत साथ देण्याची ग्वाही
राजेश वरटकर
मुख्य संपादक
रोठा येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने संपुर्ण राज्य हादरले असताना आता विविध समाजघटक न्यायाच्या लढ्यात उतरू लागले आहेत. मुस्लिम समाजातील समाजसेविका व पत्रकार सादिया अख्तर यांनीही या प्रकरणात तीव्र संताप व्यक्त करत चिमुकलीला न्याय मिळेपर्यंत पीडित कुटुंबासोबत खंबीरपणे उभे राहण्याची घोषणा केली.
मुळच्या बिहार राज्यातील असलेल्या आणि सध्या वर्धा जिल्ह्यातील बोरगाव येथे वास्तव्यास असलेल्या सादिया अख्तर यांनी, चिमुकली च्या शवविच्छेदन वेळी प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भुमिका घेतली होती तेव्हा पोलिसांनी सादिया अख्तर यांच्या सह १० लोकांवर गुन्हा दाखल केला आहे,मात्र प्रशासनाने या प्रकरणात गुन्हा दाखल केला असला तरी न्याय मिळेपर्यंत आपण मागे हटणार नसल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. दोषींना कठोर शिक्षा मिळावी आणि पीडित कुटुंबाला संपुर्ण न्याय मिळावा, हीच आपली भुमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार आणि समाजसेविका म्हणुन सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणाऱ्या सादिया अख्तर यांनी, या प्रकरणात धर्म, जात किंवा पक्ष न पाहता मानवतेच्या भुमिकेतुन प्रत्येकाने पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. चिमुकलीला न्याय मिळवुन देण्यासाठी सुरू असलेल्या लढ्यात शेवटच्या क्षणापर्यंत साथ देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, चिमुकलीच्या न्यायासाठी वर्ध्यासह संपुर्ण जिल्ह्यात सर्व स्तरांतुन श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात येत आहे.

