विशेष प्रतिनिधी
वर्धा
वर्धा जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन पोलीस विभाग वर्धा व पोलीस बॉईज असोसिएशन, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धा जिल्हा ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धा २०२६–२७ चे आयोजन दि. १ व २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता पोलीस मुख्यालय, वर्धा येथे करण्यात आले आहे.ही स्पर्धा ४० व्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी वर्धा जिल्हा संघ निवड चाचणी म्हणुन आयोजित करण्यात आली असून, स्पर्धा वर्ल्ड ॲथलेटिक्स (२०२६) व भारतीय ॲथलेटिक्स महासंघ (AFI) यांच्या नियमावलीनुसार पार पडणार आहे.स्पर्धेमध्ये पुढील वयोगटांतील मुला-मुलींसाठी धावणे, उड्या, फेक, रिले तसेच संयुक्त स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.वयोगट (जन्मतारीख):१४ वर्षांखालील : दि. २८ ऑक्टोबर २०१२ ते २७ ऑक्टोबर २०१४ दरम्यान जन्मलेले.१६ वर्षांखालील : दि. २८ ऑक्टोबर २०१० ते २७ ऑक्टोबर २०१२ दरम्यान जन्मलेले.१८ वर्षांखालील : दि. २८ ऑक्टोबर २००८ ते २७ ऑक्टोबर २०१० दरम्यान जन्मलेले.२० वर्षांखालील : दि. २८ ऑक्टोबर २००६ ते २७ ऑक्टोबर २००८ दरम्यान जन्मलेले.या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडुंना महाराष्ट्र राज्य संघातुन राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित मुदतीपुर्वी पुर्ण करणे आवश्यक असून, सहभागी खेळाडुंनी आवश्यक पात्रता निकष पुर्ण करून AFI UID अनिवार्यपणे सादर करावा.वर्धा जिल्ह्यातील सर्व संलग्न क्रीडा संस्था, शाळा, महाविद्यालये, क्रीडा क्लब तसेच पात्र खेळाडुंनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वर्धा जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे जिल्हा सचिव रमेश बुटे यांनी केले आहे. प्रवेश ३०जुलै पर्यंत स्वीकारण्यात येईल ३१ जुलैला चेस नंबर वितरित करण्यात येणार आहेत अधिक माहितीसाठी संपर्क:
राजेश उंबरे – ९८२२४५९८९१
रवींद्र काकडे – ८००७९००८६७
सागर राऊत – ९९२२३३८६०२
सुधाकर वाघमारे ७५८८५५९१०३
अमोल मानकर – ९६३७६२६३७८
रणजीत धोटे – ९५२७२७६०९९

