रिसील संस्थेच्या वतीने कार्याची दखल
शिवशाही न्युज नेटवर्क
सिंदी रेल्वे परिसरात आपल्या निषनांत आणि तत्पर पशु वैद्यकीय सेवेने पशु पालकांच्या तोंडावर येणारे पहिले नाव म्हणजे डॉ.विजय बोरकर यांनी आपल्या अखंड २१ वर्षाच्या सेवेने विशेष नावलौकिक कमाविला आहे.याच कार्याची दखल घेत रिसील इन या संस्थेने डॉ.बोरकर यांना पशु वैद्यकीय सेवेमधील योगदानासाठी “विदर्भ रत्न पुरस्कार २०२६” देऊन सन्मानित केले.
सदर पुरस्कार सॉलिटेअर हॉटेल अँड बँक्वेट्स नागपुर येथे रविवारी (ता.१९) ला विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कार्य, करणाऱ्या व्यक्तींना नावीन्यपुर्ण योगदान आणि उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहळ्यात प्रसिद्ध मराठी नटी वर्षा उसगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला विदर्भातील पशु वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित डॉक्टराची उपस्थिती होती.
“मी उन,वारा,पाऊस या तिन्ही ऋतूत रात्री अपरात्री पशु पालकांच्या बांधावर,गोठ्यावर जाऊन केवळ मुक्या प्राण्यांप्रती श्रध्दा आणि आस्था ठेवुन जी सलग २१ वर्षांपासुन सेवा करतो आहे त्याची या पुरस्काराने पावती मिळाल्याचा मनस्वी आनंद झाला.
मात्र पुरस्कारने जबाबदारीपण वाढली आहे. ती मी अशीच निभावीत राहणार अशी माझ्यावर विश्वास ठेवुन हाक मारणाऱ्या सर्व पशु पालकांना याप्रसंगी देतो आणि हा पुरस्कार त्यांनाच अर्पण करतो.”
डॉ विजय बोरकर
पशु वैद्यकीय अधिकारी


