अनुज वरटकर
प्रतिनिधी
घोराड : आषाढी एकादशीच्या निमित्ताने वर्धा ते श्रीक्षेत्र घोराड अशी पायदळ वारी करून हिरामण ढोले व सौ. नंदा ढोले यांनी वारकरी परंपरा जपण्याचा आदर्श घालून दिला. गेल्या पाच वर्षांपासुन हे दांपत्य नियमितपणे पायदळ वारी करत असुन यावर्षीही त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भक्तिभावाने वारी पुर्ण केली.पायदळ वारीचे हे पाचवे वर्ष आहे.
हिरामण ढोले यांनी सांगितले की, “पायदळ वारीचा आनंद ही एक वेगळीच अनुभुती आहे. प्रत्येक पावलागणिक विठ्ठलनामाचा गजर करत चालताना मनाला अपार समाधान मिळते. ज्यांना पंढरपुरला जाऊन श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी श्रीक्षेत्र घोराड येथे श्री संत केजाजी महाराजांच्या कृपेने साक्षात पांडुरंग आणि माता रुक्मिणीचे दर्शन झाल्याची अनुभुती मिळते.”
यावेळी हिरामण ढोले, सौ. नंदा ढोले, गोपाल वाळुकर, मोहित ढोले, अभिजित भुते यांच्यासह एकुण आठ वारकऱ्यांनी वर्धा ते घोराड ही पायदळ वारी पूर्ण केली. त्यांच्या या भक्तिमय प्रवासाचे परिसरात कौतुक होत असुन त्यांनी वारकरी परंपरा आणि भक्तीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला.

